लॉक डाऊनमुळे सगळ्या कार्यक्रमांचे स्वरूप बदलून गेले आहे.पूर्वी धुमधडाक्यात साजरे केले जाणारे विवाह समारंभ देखील आता बंद झाले आहेत.
केवळ पन्नास निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह सोहळा सरकारी अटी, नियमांचे पालन करून उरकला जात आहे.त्यामुळे अनेक अनावश्यक खर्चाना फाटा मिळत आहे.
असाच एक अत्यंत साधेपणाने विवाह कपिलेश्वर कॉलनी येथे पार पडला.2 मे रोजी मदन महादेव लोहार यांचा विवाह गोंधळी गल्लीतील रवी बाळकृष्ण शहापूरकर यांची कन्या राणी हिच्याशी होणार होता पण लॉक डाऊनमुळे हा विवाह पुढे गेला.
बुधवारी कपिलेश्वर कॉलनी येथे हा विवाह मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला.कोणताही डामडौल नसताना अत्यंत साधेपणाने हा विवाह झाला.पोलिसांनी देखील या वधूवरांना शुभेच्छा दिल्या.