लॉक डाऊन’मुळे अनेक कामगार परराज्यात अडकून पडले आहेत. बेळगावातील काही कामगारही बाहेर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. अशीच घटना गोव्यातही घडली आहे. मात्र आमदार सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
गोवा पणजी येथे बेळगावातील चिखलगुड गावचे कामगार अडकून पडले होते. त्याची माहिती सतीश जारकीहोळी यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिली. त्यांनी तातडीने संबंधित कामगारांची संपर्क साधून त्यांना जीवनावश्यक वस्तू व काही पैशांची मदत केली आहे. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून यामुळे कोणतीही अडचण असल्यास आम्हाला सांगा असे आश्वासनही दिले आहे.
या आधी सतीश जारकीहोळी यांनी पाच हजार कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करून मदत केली आहे. याच बरोबर आपल्या कार्यक्षेत्र आणि इतर क्षेत्रातही त्यांनी गरीब व गरजू कुटुंबीयांना मदत केली आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आता गोवा येथे अडकलेल्या कामगारांसाठी ते धावून गेले आहेत. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
गोवा पणजी येथे चिखलगुडचे काही कामगार अडकून पडले ही माहिती त्यांना समजली. त्यांनी तातडीने गोवा येथेही आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनीही याबाबत तातडीने दक्षता घेत त्यांना मदत केली व संबंधित साहित्याचे फोटोही आमदार सतीश जारकीहोळी यांना पाठविले आहेत. सतीश जारकीहोळी यांच्या कार्याने तेथील कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.