शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्त्यांवर गेल्या दोन महिन्यापासून घालण्यात आलेले बॅरिकेट्स तात्काळ हटविण्यात यावेत अशी मागणी रविवार पेठ, कांदा मार्केट, मेणसे गल्ली व भातकांडे गल्ली येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रविवार पेठ, कांदा मार्केट, मेणसे गल्ली व भातकांडे गल्ली येथील व्यापाऱ्यांनी मंगळवारी आपल्या मागणीची निवेदन जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना सादर केले आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेच्या परिसरातील रस्ते गेल्या दोन महिन्यापुर्वी ठीकठिकाणी बॅरिकेड्स घालून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात लॉक डाऊन येथील झाला जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले. तथापि संबंधित रस्त्यावर करण्यात आलेले बॅरिकेड्स अद्याप पाठवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन त्याचा या भागातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तेंव्हा रहदारीस अडथळा ठरणारे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान करणारे सदर बॅरिकेड्स तात्काळ हटवण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
रविवार पेठ, कांदा मार्केट, मेणसे गल्ली व भातकांडे गल्ली येथील व्यापाऱ्यांच्या मागणीसंदर्भात आशीर्वाद प्लास्टिकचे मल्लेश हाजगोळकर यांनी “बेळगाव लाईव्ह” ला माहिती देताना सांगितले की मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली, रविवार पेठ व कांदा मार्केट परिसरातील रस्त्यांवर गेल्या दोन महिन्यापासून बॅरिकेड करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील व्यापार धंद्यावर विपरित परिणाम होत आहे. यापूर्वी सदर बॅरिकेड्ससंदर्भात तक्रार करून ते काढण्याची मागणी करण्यात आली होती.
संबंधित अधिकाऱ्यांनी देखील चार दिवसात संबंधित बॅरिकेट्स हटविण्याचे आश्वासन दिले होते. तथापि आता 8-10 दिवस झाले तरी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटविण्यात आलेले नाहीत. येतात का हटविले जावेत यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे, असे हाजगोळकर यांनी सांगितले. याप्रसंगी बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.