Saturday, December 28, 2024

/

बेळगाव परिसरात कसे असेल या महिन्याचे पर्जन्यमान…

 belgaum

या महिन्याचं पर्जन्यमान काय सांगतो मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाबरोबरच जोरदार वाराही वाहू लागला आहे. यावर्षी अनेक पर्जन्यमान पंचांगातून पाऊस समाधानकारक पडेल अशी सूचना दिली आहे.

त्यामध्ये मे महिन्यात ही काही प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे तर अजून पाऊस पडेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतला आहे. मे महिन्यात मध्ये रविवार दिनांक 24 रोजी पासून रात्री 2 वाजून 33 मिनिटांनी रोहिणी नक्षत्र लागणार आहे. याचे वाहन कोल्हा असून हवेत उष्मा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळी वारे आणि जोरदार पावसाची ही शक्यता व्यक्त होत आहे. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह पावसाची हजेरी लागणार आहे. अखेरीस विद्युत्पात गरजुन खंड दृष्टीने पाऊस पडेल.

मे महिन्यामध्ये 28 29 30 31 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता रुईकर पंचांगने व्यक्त केली आहे. याच बरोबर जून महिन्यात ही एक दोन व चार तारखेला सृष्टी दर्शक पाऊस सुरू होणार आहे. त्यानंतर मृगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या मागील काही दिवसापासून अधूनमधून पडत असलेला पाऊस हा लाभदायक ठरत असला तरी मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता होती मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग शेतातील कामे करून घेण्याकडे घाई गडबड करत आहेत.

लवकरच धूळपेरणी संपत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या लॉक डाऊन मुळे अनेक जण घरीच बसणे पसंत करत असले तरी शेती कामाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग शेतामध्ये दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.