लॉकडाऊनमुळे गेल्या ४८ दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजारपेठ बंद करण्यात आली होती. मात्र आता जिल्हा प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पांगुळ गल्ली येथील व्यवसायिकांना अजूनही सुरु करण्यास मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून तातडीने आम्हालाही मुभा द्यावी, अशी मागणी पांगुळ गल्ली येथील जागृती व्यापारी असोसिएशनने निवेदनव्दारे केली आहे.
पांगुळ गल्लीमध्ये कपडे स्टेशनरी प्लास्टीक यासह इतर जीवनावश्यक वस्तु होलसेल दरात मिळत असतात. त्यामुळे ग्राहकांचा ओढा अधिक असतो. किरकोळ दुकानदारही तेथूनच होलसेलमध्ये साहित्य खरेदी करतात. तेव्हा आम्हालाही व्यवसाय करण्यास तातडीने मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आझाद गल्लीतील महिला कोरोना पोजिटिव्ह सापडल्या नंतर अर्धी पांगुळ गल्ली कँटेनमेंट झोन घोषित करण्यात आली होती त्या नंतर इथे प्रवेश बंदी देखील झाली आहे आता जागृती व्यापारी संघटनेनं या बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रोहीत रावळ, संदीप जैन, संदीप बसरीकट्टी, अमरलाल खटल, दिलीप जैन, महेश पोरवाल, प्रेमजी महर्षी यांच्यासह व्यापारी वर्ग उपस्थित होते.