रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील कारखाने,व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागातील उद्योग,व्यवसाय सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.कारखाने सुरू करण्यापूर्वी स्वयंघोषित प्रमाणपत्र उद्योजकांना सादर करावे लागणार आहे.
कारखाने,आय टी/आय टी एस कंपन्या,डेटा ,कॉल सेंटर, टेलिकम्युनिकेशन ,इंटरनेट सर्व्हिस,इंक्यूबेटर आदी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.कारखाने आणि उद्योग सुरू करण्यापूर्वी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन करणे आवश्यक आहे.
www.kum.karnataka.gov.in या वेबसाईट ला भेट देऊन कोविद 19 संबंधी घोषणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.या पूर्वी परवानगी घेतलेल्या उद्योगांनी देखील येथे माहिती अपलोड करणे आवश्यक आहे असे जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त संचालकांनी कळवले आहे.