Tuesday, January 28, 2025

/

आंतरराज्य प्रवासासाठी यापुढे जिल्ह्यातील “हे” मार्ग असतील खुले

 belgaum

लॉक डाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या विस्थापित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांच्या आंतरराज्य प्रवासास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासह राज्यात ये – जा करणाऱ्यांसाठी ठराविक मार्ग निर्धारित केले असून या मार्गावरूनच संबंधितांनी ये – जा करणे बंधनकारक असणार आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ये – जा करणाऱ्यांसाठी निर्धारित केलेले मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. 1) एनएच – 4 कोगनोळी, निपाणी तालुका. 2) चोर्ला, खानापूर तालुका. 3) कागवाड, कागवाड तालुका. देशाच्या अन्य भागातून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या अथवा राज्याबाहेर जाणाऱ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम सेवा सिंधू वेबसाईटवर आपले रजिस्ट्रेशन करणे. यामध्ये आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत आपल्या सोबत किती लोक आहेत आदी आवश्यक तपशील भरणे. त्यानंतर अर्जदाराला पोचपावती दाखल संबंधित नंबर दिला जाईल. सदर अर्जदाराच्या अर्जाची संबंधित जिल्हाधिकारी आणि नोडल अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ई- पास डाउनलोड करण्याची लिंक पाठविली जाईल. लिंक पाठवलेल्या दिवसापासून एक आठवड्यासाठी सदर पास वैध असणार आहे प्रशासन या ई – पासची वैधता जाणून घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंग करेल.

Seva sindhu
Seva sindhu

ई- पास मिळवलेली व्यक्ती स्वतःच्या खाजगी वाहनाने, भाड्याच्या वाहनाने अथवा बसने प्रवास करू शकते. मात्र बससह संबंधित वाहने व्यवस्थित निर्जंतुकीकरण केलेली असावीत. वाहनांमध्ये सोशल डिस्टन्ससिंगच्या नियमाचे पालन केले गेले पाहिजे. या अनुषंगाने कारगाडीत 3 व्यक्ती, एसयूव्हीमध्ये 5 व्यक्ती, व्हॅनमध्ये 10 व्यक्ती आणि बसमध्ये 25 व्यक्तींना प्रवास करण्यास अनुमती असणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर प्रत्येक चेक पोस्टवर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

 belgaum

त्यावेळी जर का एखाद्यामध्ये कोरोना ची लक्षणे आढळल्यास संबंधी त्याला थेट करुणा उपचार केंद्र अथवा मान्यताप्राप्त इस्पितळात पाठविले जाईल. सद्य परिस्थिती लक्षात घेता जनतेने यापुढे शासनाच्या आरोग्य सेतू ॲप इंस्टाल करणे बंधनकारक आहे. आंतर जिल्हा, आंतर राज्य प्रवासादरम्यान कांही समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी 080-22636800 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आंतर राज्य एकाच वेळी प्रवास करणारे या सुविधेचा लाभ घेऊ शकतात इथं अर्ज करू शकतात

1. कर्नाटकमधून भारतातील अन्य राज्यात जाण्यासाठी
https://serviceonline.gov.in/karnataka/directApply.do?serviceId=1084

2. भारतातील अन्य राज्यातून कर्नाटकात येण्यासाठी
https://serviceonline.gov.in/karnataka/directApply.do?serviceId=1082

3. अन्य देशातून कर्नाटकात येण्यासाठी
विविध राज्यात,देशात अडकलेल्या व्यक्तींनी वरील लिंकचा वापर करून ऑन लाईन अर्ज करायचा आहे.

https://serviceonline.gov.in/karnataka/directApply.do?serviceId=1085
All links are working when we checked.

Track your status here
https://serviceonline.gov.in/karnataka/citizenApplication.html

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.