रंगात मिसळण्यासाठी आणलेल्या टर्पेंटाइन पिऊन एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना बाळेकुंद्री बुद्रुक येथे घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निधा इमरान जमादार असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. त्यांच्या वडिलांनी आपल्या छकडा गाडीला रंग लावण्यासाठी काही कलर आणला होता.
त्या कलरमध्ये मिश्रित करण्यासाठी टर्पेंटाइन आणले होते. दिनांक 4 मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी आपल्या गाडीला रंग लावण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी त्यांची मुलगी निधी ही तेथेच खेळत होती. नकळत त्यांनी टर्पेंटाइन मिसळलेली बाटली निधीच्या हाती लागली.
ती खेळत असताना अचानक तिने टर्पेंटाइन प्याले. ही घटना निधीच्या आईने पाहिली. त्यांनी तातडीने संबंधित बाटली काढून घेतले. मात्र तोपर्यंत निधीने त्याच्यातील काही थेंब पिले होते. त्यामुळे ती अत्यवस्थ झाली. निधीला तातडीने स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मात्र त्याच्यावर उपचार सुरत होते. त्यानंतर बेळगाव येथील खासगी इस्पितळात निधीला हलविण्यात आले. त्याच्यावर मागील तीन ते चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी निधीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे लहान बालकांकडे पालकांकडे लक्ष देण्याची गरज ही अनेकांनी व्यक्त केली आहे.