महानगरपालिकेने केलेल्या अवाजवी घरपट्टी वाढी विरोधात जनतेसह माजी नगरसेवक संघटनेने देखील विरोध दर्शविला आहे.या संबंधी पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची देखील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन देखील घरपट्टी वाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे.
त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देखील पालकमंत्र्यांनी दिले होते पण ही घरपट्टी वाढ काही मागे घेण्यात आलेली नाही.फक्त घरपट्टी भरणाऱ्यांना देण्यात येणारी पाच टक्के सवलतिची मुदत वाढवण्यात आली आहे.ही पाच टक्के सवलत 31 मे पर्यंत होती पण आता नगरविकास खात्याचे सचिव डॉ जे रविशंकर यांनी नवा आदेश काढून पाच टक्के सवलतीची मुदत 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आल्याचे नमूद केले आहे.
करोनामुळे सोशल डिस्टनसिंग आणि अन्य नियमांचे पालन नागरिकांना करावे लागत आहे.त्यामुळे नागरीकांच्या हितार्थ पाच टक्के घरपट्टी सवलतीची मुदत वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
बेळगावात माजी नगरसेवक संघटनेने मंत्र्यांना भेटून लॉक डाऊन रद्द करा अशी मागणी केली होती मात्र घर पट्टी वाढ रद्द झालो नाही मात्र भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.