लॉक डाऊन सुरू झाल्यापासून सर्वच ठिकाणी मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण देशी आणि इतर दारू कडे वळले होते. मात्र राज्य सरकारला आर्थिक चणचण भासत असल्याने पुन्हा दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात दारू दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र ती गर्दी आता कमी झाली आहे. सुमारे चाळीस ते बेचाळीस दिवस दारू दुकाने बंद असल्याने मद्य शौकिनांना मोठी कसरत करावी लागली होती. अनेक ठिकाणी डबल पैसे देऊन दारू खरेदी करण्यावरही मद्य शौकिनांनी भर दिला होता.
मात्र सरकारने अबकारी विभागात येणाऱ्या सरकारी दारू दुकानांना खुली करण्याची परवानगी दिली आणि दुकानांसमोर एक ते दीड किलोमीटर तळीरामांचा रांगा लागल्या होत्या. या रांग आता कमी होत आहेत. बेळगाव जिल्ह्यात फक्त एका दिवसात सात कोटी रुपयांची दारू तळीरामानी रीजवली होती. दारू दुकानासमोर दोन ते तीन दिवस लांबच्या लांब रांगा लागत होत्या. दोन तास तीन तास थांबून तळीराम दारू खरेदी करत होते. आता या रांगा कमी झाल्या आहेत. अनेकांनी तर महिन्याची दारू एका दिवसातच घेऊन ठेवली आहे.
त्यामुळे दारू दुकानासमोरील गर्दी कमी होत आहे. सरकारने बार व रेस्टॉरंट चालकांना देखील दारू विक्रीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात गर्दी ओसरली असली तरी मद्य शौकिनांना मात्र अजूनही काही ठिकाणी रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. अव्वाच्या सव्वा दर घेऊन अनेकांची लुबाडणूक सुरू आहे. त्यामुळे याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.