मागील दोन महिन्यापासून बंद असलेले बेळगाव विमानतळ आता सोमवारपासून सुरू होणार असून आता येथून विमाने झेप घेऊ शकणार आहेत.
सोमवारी 25 मे रोजी स्पाइस जेट कंपनीने आपल्या मुंबई बेळगाव विमानसेवेची घोषणा केली असून त्यासाठी बुकिंग सुरू आहे. तर 27 तारखेला बेळगाव बेंगळूर विमानसेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.
कर्नाटकात जिल्ह्यांतर्गत बस आणि रेल्वे प्रवास सुरू करण्यात आला आहे. पण महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्यासाठी ही सोय नाही. पण विमानमार्गाने मुंबईतून येण्याची संधी मिळणार आहे.
या प्रवाशांना विमानतळावर स्क्रीनींग आणि कॉरंटाईन प्रक्रियांना सामोरे जावे लागणार आहे. कर्नाटकाला महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा अधिक संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातून प्रवासी येण्यावर बंदी घालण्यात आली होती, पण आता विमान प्रवासाची सोय देण्यात आली आहे. लवकरच इतर शहरांसाठीही विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
बेळगाव विमान तळावरून दररोज 14 विमान झेप घेत होती मात्र कोरोनामुळे बंद झालेली विमान सेवा 25 पासून केवळ मुंबई आणि बंगळुरू पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे त्यासाठी स्पाईस जेट आणि स्टार एअर या दोन्ही कंपन्यांनी वेबसाईटवर बुकिंग सुरू केलं आहे.