यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी लॉक डाऊन मध्ये आपल्या मतदारसंघात भाजीपाला आणि रेशनचे वितरण हजारो कुटुंबाना केले आहे.याशिवाय काही दिवसांपूर्वी मुबाईहून परतलेल्या एक हजार जनतेची आपल्या दडी येथील गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करून लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण समोर ठेवले आहे.
मुबईतील एक हजार कामगार काम नसल्याने परत आले.ते जारकीहोळी यांच्या मतदारसंघातील होते.त्यांनी सरकारकडून परवानगी घेऊन त्यांना आपल्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईन करण्याची परवानगी घेतली. त्या कामगारांना रोज दोन वेळ भोजनाची देखील सोय केली आहे.
एक हजार कामगारांना ते मुबाईहून आल्यावर कोगनोळी येथून त्यांना वाहनाने गेस्ट हाऊसला आणून गेस्ट हाऊसमध्ये ठेवले.त्यांच्या भोजनाची व्यवसथा जारकीहोळी यांनी केली असे जारकीहोळी यांचे कार्यकर्ते मुन्ना बागवान यांनी सांगितले.
मुंबईत सध्या कामधंदा नसल्याने आणि पैसे संपल्याने एक हजार जण आम्ही मुंबईहून परत आलो असे बाबुराव पाटील यांनी सांगितले.