कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव कसा साजरा करायचा याबाबत पत्रा द्वारे शहरातील सर्व गणेश मंडळाचे विचार जाणून घेण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी सकाळी शहरातील सिध्दभैरवनाथ संस्थेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी गणेश महामंडळाची बैठक झाली.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी महा मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील होते. यावेळी कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर,प्रकाश मरगाळे यांनी विचार मांडले.
महा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर्षी होणारा गणेश उत्सव कसा असला पाहिजे कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात कसा उत्सव साजरा करावा याबाबत अनेकदा मध्यवर्ती महा मंडळाकडे विचारणा होत होती यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे लेखी विचार घेऊन आगामी दहा दिवसां नंतर व्यापक बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
सचिव शिवराज पाटील व्हाट्स अप्प क्रमांक 9845960531 तर अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील व्हाट्स अप्प क्रमांक 9448849815 यावर आणि सिद्ध भैरनाथ मंदिर पाटील गल्ली बेळगाव या पत्त्यावर पत्र लिहून मंडळांनी आपापले विचार कळवावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.बैठकीस महा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.