8 मार्चला राज्यात पहिली पॉझिटीव्ह केस मिळाल्या पासून आज 10 मे पर्यंत कर्नाटक राज्याने अनेक कोरोना चाचण्या केल्या आहेत. संशयित सापडला की चाचणी हे सूत्र वापरून कर्नाटकाने एक लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण केला आहे.
कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ डी के सुधाकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आम्ही चाचण्यांच्या बाबतीत एक लाखाचा टप्पा पार केला आहे.
कोरोना विरोधातील आमची लढाई यापुढे अधिक त्वेषाने सुरू राहणार आहे. चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी 60 प्रयोगशाळा सुरू करून दिवसाला 10 हजार चाचण्या करण्याची तयारी सुरू आहे. असं त्यांनी या ट्विट मधून सांगितलं आहे.
कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे नमुने घ्यावे लागतात. यासाठी तज्ञ डॉक्टरांची गरज असते. रुग्णांना तपासण्यासाठी आणि त्यांचे नमुने तपासण्यासाठी यंत्रणा लागते. सुरुवातीला ती कमी होती. पण गरज ओळखून कर्नाटक सरकारने ही सुविधा वाढवली.
एकीकडे राज्यातील एक लाख चाचण्या झाल्या असताना बेळगावात देखील गेल्या दीड महिन्यात 6449 चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यातील 85 पोजिटिव्ह असल्या तरी आता पर्यंत 5869 चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.