आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधील तंदुरुस्त रोगप्रतिकारक (असिम्टॅमेटिक) प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे विलगीकरण (काॅरन्टाईन) केले जाऊ नये, याचा पुनरुच्चार राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा आयुक्तालयाने शुक्रवारी एका आदेशाद्वारे केला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना ते जर रोगप्रतिकारक तंदुरुस्त आढळले तर संबंधितांचे कोणत्याही प्रकारचे विलगीकरण केले जाऊ नये.
उर्वरित प्रवाशांच्या बाबतीत मात्र ठरलेल्या पद्धतीने प्रक्रिया पार पाडली जावी, अशा आशयाचा तपशील राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे.