लॉक डाऊनमुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या नाभिक,धोबी,रिक्षा आणि टॅक्सी चालक,बांधकाम मजूर,विणकर आणि अन्य वर्गासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी 1610 कोटी रू च्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे.बंगलोरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
नाभिक आणि धोबी याना प्रत्येकी पाच हजार रू आर्थिक मदत दिली जाणार आहे.यामुळे 2.30 लाख नाभिक आणि साठ हजार धोब्याना याचा फायदा होणार आहे.राज्यातील 7.75 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी पाच हजार रू परिहार धन देण्यात येणार आहे.विणकर सन्मान योजने अंतर्गत 54 हजार विणकरांना दोन हजार रू सन्मान धन दिले जाणार आहे.
कर्नाटकात अठरा लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत.त्यांच्या खात्यावर यापूर्वीच दोन हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.या कामगारांना अडकलेल्या ठिकाणाहून आपल्या गावी जाण्यासाठी आहेत.त्यांच्या खात्यावर यापूर्वीच दोन हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.
या कामगारांना अडकलेल्या ठिकाणाहून आपल्या गावी जाण्यासाठी त्यांच्या खात्यावर आणखी दोन हजार रुपये जमा करण्यासाठी आदेश बजावण्यात आला आहे.फुलझाडांची शेती केलेल्या शेतकऱ्यांना परिहारधन हेक्टरला पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहेत.भाजीपाला आणि फळ उत्पादकांच्या नुकसानीची माहिती घेऊन त्यांना देखील मदत करण्यात येणार आहे.त्या संबंधीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.