लॉक डाऊन परिस्थिती उद्भवली आणि अनेक जण घरीच बसून आहेत. अशा परिस्थितीत देखील काही संस्था प्राण्यांच्या पोटापाण्यासाठी झटत आहेत तर पक्षांकडे ही कुणीतरी लक्ष देण्याची गरज आहे. नुकतीच बेळगाव येथे अग्निशामक दलाने पतंगाच्या मांजात अडकून पडलेल्या घारीला जीवदान दिले आहे.
अरविंद नामक एका व्यक्तीने अग्निशामक दलाला फोन करून संबंधित घार मांजात अडकून तिचा जीव धोक्यात असल्याची माहिती दिली. यासंबंधी अग्निशामक दलाचे अधिकारी तातडीने त्याठिकाणी जाऊन संबंधित घारीला व्यवस्थित मांजातुन बाहेर काढले व तिला जीवदान दिले आहे.
याआधीही पतंगाच्या माझ्याकडून अनेक पक्ष्यांचा जीव गेला आहे. तर काहींनी सामाजिक भान राखत त्यांना जिवदानि दिले आहे. मात्र पतंग उडवणे किती धोक्याचे आहे हे अनेकांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याचे सोयरसुतक नसलेल्यांना आपल्या आनंदात रममान होण्याचे मोल अधिक असल्याचे दिसून येत आहे. यापुढे मांजाचा वापर करू नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अग्निशामक दलाचे अधिकारी टककेकर यांनी संबंधित पक्षांना वैद्यकीय उपचार करून त्याला सोडून देण्यात आले. टकेकर यांनी संबंधित पक्षांना पाणी पाजले. याबाबतची माहिती समजतात घटनास्थळी भेट देऊन पक्षाला जीवदान दिल्याबद्दल पक्षीप्रेमीतून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.