लॉक डाऊन परिस्थितीमुळे माणसांबरोबरच जनावरांचे हाल होत आहेत. मात्र या सार्यांची व्यवस्था करण्यासाठी संस्था धावत आहेत. अशा परिस्थितीत पक्षांकडे ही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असताना नुकतीच डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी एका पक्षाचे प्राण वाचविले आहेत.
नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे एका घुबडाच्या पिल्लाची अवस्था बिकट झाली होती. पावसामुळे त्या पिल्लाला मोठा त्रास झाला. एक झाड घराजवळ कोसळले होते. त्यामुळे त्या पिल्लाचा जीव धोक्यात आला होता. सुलगा येथे ही घटना घडली होती. त्या पिल्लाचे प्राण वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली.
वादळी वाऱ्यामुळे सुळगा येथील काही झाडे कोसळली होती. यात झाडांमध्ये वास्तव्यास असलेल्या घुबडाचे पिल्लू रिषभ पाटील यांच्या घराजवळ घुटमळत होते. ते पाहून पाटील यांनी तातडीने याची माहिती सोनाली सरनोबत यांना दिली. सोनाली सरनोबत यांनी घटनास्थळी भेट दिली.
संबंधित पिलाला पकडून त्याला पाणी पाजले व खाण्यासही देण्यात आले. त्यानंतर डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी त्या पिलाला वनविभागाकडे सुपूर्द केले. सोनाली सरनोबत यांच्या कार्यामुळे एका पक्षाला जीवदान मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.