शहरातील बहुतांश कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्यामुळे येत्या 15 मेपर्यंत शहरातील बहुतांश “कंटेनमेंट झोन” रद्द केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी सोमवारी दिली.
सध्या, पिरनवाडी आणि येळ्ळूर या दोन भागातील कंटेनमेंट झोन अल्पावधीत हटविण्यात येतील. अधिकृतरित्या सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांच्या क्रमवारीत बेळगाव जिल्हा बेंगलोरनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 113 आहे. यापैकी 107 बेळगाव जिल्ह्यातील असून 8 बागलकोट जिल्ह्यातील आहेत. या सर्व रुग्णांवर बेळगावातील मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा काॅरन्टाईनचा कालावधी येत्या 22 मेपर्यंत संपणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना तपासणीचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. या खेरीज प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या संशयितांना शोधून काढले जात आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 6,620 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 6,161 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.