कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने कर्नाटक मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लोकमान्य सोसायटी व परिवाराचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी या संदर्भात किरण ठाकुर यांना कृतज्ञतेचे पत्र पाठविले असून त्यामध्ये म्हंटले आहे की, कोरोना थोपविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन करावे लागले. नियम पाळून काळजी घेण्यात आली. परंतु शेतकरी, कामगार, मजूर, लघुउद्योजक, फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक यांच्यासह अनेक घटक अडचणीत आले.
या सर्वांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि कोरोनाची लागण झालेल्यांना उत्तम दर्जाचे उपचार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडताना तुम्ही सरकारला हातभार लावून मानवी औदार्य दाखविले आहे. 31 मार्च रोजी आपण जो निधी पाठविला आहे, त्याचा आम्ही कृतज्ञतेने स्वीकार करत आहोत. तुमच्या या मदतीचा कोरोनाला थोपविण्यासाठी सरकारला उपयोग होणार आहे. त्यामुळे सरकार कृतज्ञ आहे. आपले सहकार्य असेच राहो, असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपल्या आभार पत्रात नमूद केले आहे.