सुधारित एपीएमसी कायद्यामुळे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल हा विश्वास
एपीएमसी कायद्याचे उदारीकरण करण्याच्या अध्यादेशाचा बचाव करीत मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा म्हणाले की, जर शेतकऱ्यांच्या हितावर परिणाम झाला तर ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एक मिनिटही जास्तवेळ थांबणार नाहीत.
विरोधी पक्षांचे आक्षेप असूनही गुरुवारी मंत्रिमंडळाने हा अध्यादेश काढला होता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सुधारित कायद्यामुळे शेतकर्यांना त्यांची उत्पादने थेट त्यांच्या मर्जीतील कोणालाही विक्री करता येतील.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि बाजारातील चढउतारांमुळे त्यांचे नुकसान कमी होईल. ते म्हणाले की “पंतप्रधान मोदींच्या स्वप्ना” च्या अनुषंगाने हा सुधारित कायदा 2022 पर्यंत शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळवून देण्यात मदत करेल.
विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की या दुरुस्तीमुळे मोठ्या खासगी क्षेत्रांना मदत होईल आणि एपीएमसीची शक्ती कमी होईल. मात्र असे आपण होऊ देणार नाही. या बदलात आपल्याला शेतकऱ्यांचे हित अपेक्षित आहे. यामुळे जर नुकसान झाले तर पहिला राजीनामा माझा असेल असे येडीयुरप्पा म्हणाले आहेत.