Friday, March 29, 2024

/

अखेर बेळगावातील कापड दुकाने झाली सुरू

 belgaum

मागील 46 ते 47 दिवसांपासून लॉक डाऊनमुळे अनेक व्यवहार बंद पडले आहेत. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तथापि बेळगाव जिल्हा नुकताच ऑरेंझ झोनमध्ये गेल्यामुळे काही व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. शहरातील व्यवहार निर्धारित वेळेत सुरू व्हावेत आणि वेळेत बंद व्हावेत यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारपासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत शहरातील कापड दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.

मार्केट विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी याला दुजोरा दिला आहे. बेळगाव सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे. त्यामुळे अनेक व्यवसायांना अद्याप त्यांचे व्यवसाय करण्यास रवानगी देण्यात आलेली नाही. तथापि कापड दुकानदारांना मात्र प्रशासनाने त्यांची दुकाने खुली करण्यास परवानगी देऊन दिलासा दिला आहे. यामुळे रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कापड उद्योगामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Jai ganesh
Jai ganesh

प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यामुळे शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरातील कापड व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने सुरू केली आहेत. सध्या मे महिन्यातील लग्नसराईचा मोसम संपत आला आहे, मात्र अजूनही जून-जुलै पर्यंत मुहूर्त आहेत. त्यासाठीही कापड दुकानदार सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लग्नसराईच्या मोसमात बेळगाव शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापडाच्या दुकानांमध्ये गर्दी होत असते. मात्र लॉक डाऊनमुळे गेल्या दीड एक महिन्यापासून अनेक कापड दुकाने बंद होती.

 belgaum

मात्र आता कांही दुकानांना परवानगी मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. लॉक डाऊन संपेस्तोवर सर्व व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी बेळगावमध्ये कापड दुकान सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्याने संबंधित व्यापारी आणि दुकानदारमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.