सीईटी परीक्षा जुलै 30,31 रोजी होणार असून कर्नाटक सरकारचे गेट सीईटी गो हे कोचिंग अँप सीईटी आणि नीट परीक्षेला बसणार असलेल्या विद्यार्थ्यांना वरदान ठरणार असल्याची माहिती उप मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांनी दिली आहे.
एप्रिल 20 पासून 1.69लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कोचिंगचा लाभ घेतला आहे.55000 विद्यार्थ्यांनी हे अँप डाऊनलोड केले असून 52957 विद्यार्थ्यांनी चाचणी देखील दिली आहे.ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या लक्षात घेऊन हे अँप तयार करण्यात आले आहे.त्यामुळे कमी स्पीड वर देखील याचे काम चालते.
परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू असून सोशल डिस्टनसिंग पाळणे,सॅनिटायझर उपलबंध करून देणे आणि गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी कळविले आहे.