सोमवारचा ऑरेंज झोन आणि लॉक डाऊन च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस बेळगाव साठी दिलासा देणारा ठरला आहे कारण एकाच दिवशी 11 जण कोरोनातून बरे झाले आहेत आणि सकाळच्या बुलेटिन मध्ये एकही पोजीटिव्ह आढळला नव्हता.
सोमवारी अकरा कोरोनामुक्त रुग्णांना जिल्हा इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला .रविवारी देखील बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळला नाही.यापूर्वी पंधरा जणांना कोरोनामुक्त झाल्याबद्दल डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजवर डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या सव्वीस झाली आहे.
आज डिस्चार्ज दिलेल्या कोरोनामुक्त रुग्णापैकी एक महिला आणि दहा पुरुष आहेत.बिम्स इस्पितळातून डिस्चार्ज दिलेल्यापैकी बेळगावमधील कॅम्प भागातील चार,रायबाग कुडची येथील चार आणि संकेश्वर ,येळ्ळूर ,हिरेबागेवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.जिल्ह्यात आजवर 73 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी कोरोनातून बरे झालेले रुग्ण असे आहेत.
कॅम्प भागातील रुग्ण असे –
पी-355
पी -356
पी-358
पी-359
कुडची
पी-296
पी-297
पी-299
पी-301
संकेश्वर पी-293;
येळ्ळूर पी-295
हिरेबागेवाडी पी-193.