Sunday, November 24, 2024

/

कॅरेबियन देशातील अँटिग्वा येथे कोरोनाशी लढाताहेत बेळगावच्या डॉ स्नेहा

 belgaum

मी एच. आय. व्ही. आणि टी. बी. रुग्णांवर सुद्धा उपचार केले, परंतु सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. या नवीनच उदभवलेल्या विषाणूने मला खूप कांही शिकवले आहे. मी रुग्णांवर उपचार तर करतेच आहे, परंतु त्याचवेळी माझ्या कुटुंबियांबद्दलची काळजी माझ्या मनात सतत डोकावत असते. मी आशा करते की मी उपचार करत असलेले रुग्ण बरे होतील आणि आम्ही सर्वजण या संकटातून लवकरच बाहेर पडू, या भावना आहेत कॅरेबियन देशातील अँटिग्वा येथे “कोरोना”शी लढा देणाऱ्या बेळगावच्या डॉ स्नेहा शानभाग यांच्या.

इंटर्नल मेडिसीनमध्ये एमडी असलेल्या डाॅ. स्नेहा शानभाग या कॅरेबियन देशातील अँटिग्वा येथील माउंट सेंट जॉन्स मेडिकल सेंटरमध्ये कन्सल्टंट इंटरनीस्ट म्हणून काम पाहतात. गेल्या दोन महिन्यापासून त्यांना covid-19 अर्थात कोरोना रुग्ण व्यवस्थापनाचे काम पहावे लागत आहे. बेळगावमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या डॉ. स्नेहा यांचे शालेय शिक्षण कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण जीएसएस महाविद्यालय आणि एमडी अभ्यासक्रम जे. एन. मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण झाला. पूर्वाश्रमीच्या सरदेशपांडे असणाऱ्या डॉ स्नेहा यांचा विवाह बेंगलोरचे ऑन्कोलॉजिस्ट डाॅ. नंदन शानभाग यांच्याशी झाला.

Dr sneha shanbhag
Dr sneha shanbhag antiguwa

हे उभयता आपल्या मुलांसह जगभर फिरत असतात. दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वाना येथे त्यांनी 3 वर्षे वैद्यकीय सेवा बजावली आहे या काळात त्यांनी एचआयव्ही आणि टीबी (क्षयरोग) रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यानंतर बहिण येथे दीड वर्षे वैद्यकीय सेवा केल्यानंतर ते अँटिग्वा येथे आले आहेत. या ठिकाणी गेली दीड वर्षे हे उभयता वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

अँटिग्वा येथे गेल्या 10 मार्च 2020 रोजी पहिली कोरोना केस आमच्या समोर आली आणि त्यानंतर आजपर्यंत सुमारे 25 कोरोना बाधितांवर आम्ही उपचार करत आहोत, असे डॉ. स्नेहा शानभाग यांनी सांगितले. हॉस्पिटलायझेशनची गरज असणाऱ्या 5 रुग्णांची मी स्वतः वैयक्तिकरिपणे काळजी घेतली आहे. आमच्याकडील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे आणि लॉक डाऊनही उठविण्यात आला आहे. सध्या मी दोन रुग्णांची काळजी घेत असून यापैकी एक जण गेल्या महिन्याभरापासून आयसीयूमध्ये कोरोनाशी झुंज देत आहे. हा एक महिन्याचा कालावधी एक व्यक्ती म्हणून माझ्या बरेच बदल घडून गेला आहे करुणा सारख्या अज्ञात शत्रूशी दोन हात करताना प्रचंड ताण असतो कारण आपण जे उपचार करतो त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारेल की बिघडेल हे सांगता येत नाही अशा वेळी रुग्ण बरोबर सहानुभूतीने वागणे याबरोबरच स्वतःच्या भावना आणि आलेला ताण यांच्याशी सतत झगडावे लागते, असेही डॉ स्नेहा शानभाग यांनी स्पष्ट केले.

घरामध्ये देखील मी आणि माझे कुटुंब सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत आहोत. घरात एकत्र राहत असलो तरी मी शक्यतो मुले व पतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते कारण कोरोनाच्या भयंकर आजारामुळे माझी मुले व पती आजारी पडतील अशी भीती कायम मनात दडलेली असते, असे सांगून चला संघटितपणे आपण कोरोना विरुद्ध लढूया आणि प्रार्थना करूया की आम्हाला यश लाभो, असे डाॅ. स्नेहा शानभाग शेवटी म्हणाल्या.

News source:aab

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.