तब्बल 45 दिवसानंतर धावलेली केएसआरटीसीची बस राजस्थान-जालोर ला पोहोचली आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आज राजस्थानमध्ये दाखल झाली.
कोरोना महामारीमुळे सारी परिवहन व्यवस्थाच कोलमडली होती. मागील 45 दिवसांपासून पर राज्यातील प्रवाशी अडकून पडले होते तर आपले काही प्रवाशी पर राज्यात अडकून पडले आहेत.
आता लॉक डाऊन मध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली असून काही नियम आणि अटींवर परिवहनच्या बस गाड्यानी प्रवाशांचे आणणे आणि पाठविणे सुरू आहे.
याच धर्तीवर कर्नाटक परिवहनची पहिली बस राजस्थानकडे रवाना झाली होती. ती आज राजस्थानच्या जालोर ला पोहोचली आहे. जालोर येथील महावीर चौकात पोहोचलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसचे चित्र काढण्यात आले आहे.
सरकारने सेवा सिंधू अप्प जाहीर केल्या नंतर बेळगावं हुन राजस्थानला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जालोर जिल्ह्यातील राजस्थानचे निवासी बेळगावात संख्या अधिक आहे.