बेळगावात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांचा आकडा गेले तीन दिवस थांबला असताना गुरुवारी एक संख्येने हा आकडा वाढला असून हा आकडा 73 वरून 74 झाला आहे.
हिरेबागेवाडी येथील 13 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली असून पी 364 या रुग्णाकडून तिला बाधा झाल्याचे मेडिकल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.हिरेबागेवाडी गाव बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे.
आता पर्यंत 37 जणांना इथे बाधा झाली असून एक मयत झाला आहे.बेळगाव जिल्ह्यातील कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 74 झाली आहे तर राज्याचा आकडा 701 झालाय