कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या विधानामुळे बोर्डाचे निर्वाचित सदस्य नाराज झाले.मंत्री आणि सदस्य यांनी परस्परविरोधी विधाने केली.अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांना हस्तक्षेप करावा लागला.
राज्य सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळाला नाही त्याला तुम्ही सदस्य जबाबदार आहात.तुम्ही व्यवस्थित पाठपुरावा केला नाही त्यामुळे निधी मिळाला नाही असे मंत्री सुरेश अंगडी यांनी वक्तव्य केले.यामुळे बोर्डाच्या सदस्यांनी बैठकीत वाद घातला.कोणत्या कारणासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकासकामे करण्यापासून अपात्र ठरवण्यात आले आहे असा सवाल सदस्यांनी केला.बोर्डाच्या सदस्यांनी राज्य सरकार कॅन्टोन्मेंट बोर्डाला सापत्न भावाची वागणूक देत आहे.राज्य सरकार निधी देत नसल्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत असा आरोप केला.
त्यावर मंत्री अंगडी यांनी तुम्ही योग्य पाठपुरावा केला नाही त्यामुळे निधी मिळाला नाही.तुमच्यातील मतभेद बाजूला ठेवा आणि विकासासाठी एकत्र या.सगळे मिळून बेळगावचा विकास करूया.मी कायम तुम्हाला पाठिंबा द्यायला आहे असे अंगडी म्हणाले.
बोर्डाच्या सदस्यांना ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी अंगडी यांची भूमिका समजावून सांगून त्यांच्या विधानाचा अर्थ चुकीचा घेऊ नका असे सांगून समजूत घातली.
रेल्वे स्टेशन आणि जावलील बस स्थानकाचे नूतनीकरण ,प्रलंबित कामे यावर बैठकीत चर्चा झाली.बैठकीला निरंजना अष्टेकर,साजिद शेख,रिझवान बेपारी, मदन डोंगरे आदि उपस्थित होते.