आझाद गल्ली येथील कोरोना पोजिटिव्ह पी 418 ही महिला कोरोना मुक्त होऊन तीन दिवस उलटले तरी पांगुळ गल्ली आझाद गल्ली कांदा मार्केट भागातील बॅरिकेटस हटवले गेले नव्हते त्यामुळे या भागातील लोकांनी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पर्यन्त तक्रार केली होती.अखेर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी आदेश काढत आझाद गल्ली परिसर कंटनमेंट झोन मुक्त झाल्याचा आदेश बजावला आहे.आझाद गल्ली गणपत गल्ली पांगुळ गल्ली चा परिसर सील डाऊन मुक्त झाला आहे.
पी 418 ही महिला निगेटिव्ह आली असली तरी 20 मे रोजी 28 दिवस पूर्ण झाले आहेत.21 एप्रिल रोजी सदर महिला पोजिटिव्ह आढळली होती त्यामुळे त्यानंतर 28 दिवस 20 मे रोजी पूर्ण झाले आहेत.
बेळगाव शहरात केवळ सदाशिवनगर हा भाग कंटेनमेंट झोन आहे त्या व्यतिरिक्त पूर्ण शहर सील डाउन मुक्त झालं आहे. मंगळवारी सायंकाळी लोकल बेळगाव आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये 150 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत-67डिस्चार्ज-110 पोजिटिव्ह -50 ऍक्टिव्ह केस आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
Thanx for valuable news..