अतिरिक्तलॉक डाऊन शिथलीकरण्याच्या काळात कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील कोरोना तपासणी नाक्यांच्या ठिकाणी उत्तम नियोजन केल्याबद्दल राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कमल पंत त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांचे एका पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
अलीकडेच माझ्या पाहणीत आले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निपाणीनजीक कोरोना तपासणी नाक्याच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. यावरून मला अनुमान आले की, ही सर्व व्यवस्था अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. याठिकाणी प्रवाशांच्या रजिस्ट्रेशनप्रसंगी फक्त सामाजिक अंतराच्या नियमाची नव्हते तर प्रवाशांच्या प्राथमिक सोयींचीही काळजी घेतली जात असल्याचे पहावयास मिळाले.
राज्याच्या सीमेवरील कोरोना तपासणी नाक्याच्या ठिकाणी इतके उत्तम नियोजन केल्याबद्दल आपले अभिनंदन, हे नियोजन संबंधित इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायक आहे, अशा आशयाचा तपशील राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कमल पंत यांनी जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद आहे.