बेळगावकर कोणत्याही आपत्तीला एकजुटीने सामोरे जातात. कोणतीही अडचण आली तर सारे मिळून त्याला झुंज देतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.नुकतीच बेळगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एक 28 वर्षीय हमाली काम करणाऱ्या तरुणाचा हात निकामी झाला आहे. मात्र त्याच्या कुटुंबाचे कसे होणार हा प्रश्न अंतर्मुख करणारा असून यासाठी आता बेळगावकरांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
तो हमाली करतो दररोज राबून आपलं आणि आपल्या पत्नी मुलाचे पोट भरत असतो वादळी पाऊल आला म्हणून शेड मध्ये आडोश्याला बसला होता त्यावेळी झालेल्या घटनेत त्याला हात गमवावा लागला आहे.बी एस येडीयुराप्पा मार्ग येथे वादळी पावसामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटचे होते की नव्हते झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक पत्रे उडाले व ते विखरून दूरवर जाऊन पडले. यामध्ये दोन हमाल जखमी झाले होते यामधील एका हमालाचा हात निकामी झाला आहे खाजगी इस्पितळात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी हात काढून टाकला आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हसन शेख व 28 रा. ओल्ड गांधी नगर असे त्या दुर्दैवी हमाल तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याला दोन मुले आणि पत्नी आहे. त्याचा हात या घटनेत निकामी झाल्याने त्याच्या कुटुंबियांच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. हा हात कायमचा निकामी झाल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज आहे त्यासाठी व्यापारी बंधूंनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत असतानाच बेळगावकरांनीही हातभार लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापुढे त्याचा हात कोणतेच काम करू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? एका व्यक्तीवर तिघा जणांचे पोट भरत होते. मात्र राबणाऱ्या हातालाच इजा झाली आणि हात निकामी झाला. कुटुंबीयांच्या पोटापाण्याचे यापुढे हाल होणार यात शंका नाही. त्यामुळेच अनेकांनी त्या हमालाला मदत करून माणुसकी दाखवावी असे आव्हान करण्यात येत आहे.व्होलसेल भाजी मार्केटचे व्यापारी संघटना,ए पी एम सी देखील त्याला मदत देण्याची गरज आहे.
संपर्क +91 86609 14549