Tuesday, May 21, 2024

/

मंगळवारी तीन ठिकाणी भाजी खरेदी विक्री सुरू

 belgaum

कोरोनाच्या धास्तीमुळे भाजी मार्केटमध्ये होत असलेल्या गर्दीचा विचार करून एपीएमसी प्रशासनाने तीन ठिकाणी भाजी विक्रीची केंद्रे स्थापन केली आहेत. आता तीन ठिकाणी भाजी खरेदी विक्री सुरू असल्याचे दिसून आले. मंगळवारी काही प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत नागरिक हेळसांड करत असल्याने पोलिसांनी यावेळी काहींना खटकले. मात्र व्यापारी वर्गाने सोयीस्कर होईल याची व्यवस्था भाजी खरेदीदारांना करून दिली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तिन्ही ठिकाणी 142 गाळ्यांची निर्मिती करून शेतकरी व ग्राहकांची सोय करण्यात आली आहे. जोपर्यंत कोरोणाची धास्ती संपत नाही तोपर्यंत ही भाजी मार्केट त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात येणार आहेत. ज्या भागातील शेतकऱ्यांना जे भाजीमार्केट सोयीचे वाटेल त्या ठिकाणी त्यांनी भाजी विक्री करावी असे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी भाजी विक्रीसाठी गर्दी केली होती. यावेळी काही कमिशन एजंट बऱ्याच ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले. बऱ्यापैकी होलसेल भाजीपाला विक्री झाली असून लवकरच याला सुरळीत सुरुवात होईल अशी अशा काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Malini city veg market tuesday
Malini city veg market tuesday

सोमवारी सायंकाळी व्यापार्‍यांनी आपले गाळे हाती घेतले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच भाजी मार्केट खरेदी विक्री बाजार सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. काही प्रमाणात गर्दी कमी असली तरी लवकरच याबाबत शेतकऱ्यांना माहिती होऊन संबंधित ठिकाणी शेतकरी वळतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. बी एस येडीयुराप्पा मार्गाजवळ मिलींनी सिटी येथे 60 गाळे, याचबरोबर आरटीओ परिसरात 42 गाळे आणि हिंडाल्को इथे 40 गाळ्यांमध्ये भाजी खरेदी विक्री सुरू असल्याचे दिसून आले.

 belgaum

सकाळपासूनच शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी आपली भाजी घेऊन काही प्रमाणात गर्दी केली होती. मात्र अनेकांना संबंधित ठिकाण माहीत नसल्याने परत गेल्याचे ही घटना घडली. मात्र लवकरच अनेक शेतकऱ्यांना याची माहिती होऊन त्या ठिकाणी गर्दी करतील अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरू करण्यात आलेल्या या बाजारामुळे अनेकांना सोयीचे ठरत असले तरी जोपर्यंत कोरोणाची साथ संपत नाही तोपर्यंत याठिकाणी भाजीविक्री करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनामुळे अनेक जण धास्तावले आहेत. त्याचबरोबर एपीएमसी येथील भाजी मार्केटमध्ये मोठ्याने गर्दी होत असल्याने याची खबरदारी म्हणून शहराच्या बाहेर भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या तीन ठिकाणी सुरू असलेल्या भाजी मार्केट मध्ये किरकोळ प्रमाणात भाजी विक्री झाली असली तरी बुधवारपासून गर्दी होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.