दिल्ली येथील निझामुद्दीन येथें तबलिग जमातीचा धार्मिक मरकज कार्यक्रम देशातील इतर शहरा प्रमाणे बेळगावसाठी देखील घातक ठरला आहे.संथ वाहणारं बेळगावचं जनजीवन, शून्य पोजीटिव्ह कोरोना रुग्ण असणारे निरागस बेळगाव लॉक डाउनच्या दहाव्या दिवशी घुसळून निघालं आहे. मुस्लिम समाजाच्या दिल्लीतील जमातीच्या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील 63 लोक सहभागी झाले होते लॉक डाउन जाहीर झाला आणि ते दिल्लीत अडकले, आणि तिथं असणाऱ्या मुस्लिम कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात राहिल्याने इतरांच्या बरोबर त्यांनाही कोरोनाची लागण झाली.
ते सर्व बेळगाव जिल्ह्यात परत आले ते कोरोनाची लागण घेऊनच..आल्यावर कोणतीही काळजी न घेता ते आपल्या मोहल्ल्यात फिरत राहिले ज्यावेळी प्रशासनाने शोध घेऊन त्यांची तपासणी केली असता आजच्या घडीला 63 पैकी तिघेजण कोरोना पोजीटिव्ह निघाले.अतिरेकी धर्माभिमान, शिक्षणाचा अभाव, स्वच्छतेची कमतरता अश्या अनेक कारणांमुळे त्यांचे या भयानक व्याधीकडे दुर्लक्ष झाले. आता झिरो निगेटिव्ह असणारं बेळगाव हाय अलर्ट तीन पॉझिटिव्ह झाल्यामुळे अक्षरशः भूकंपमय स्थितीत पोचलं आहे.
तबलिग मरकजचा हा कोरोना दंश बेळगावसाठी प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. मोहल्ल्या मोहल्ल्यातून लोक येऊन भाजी फळ विक्री करतात, त्यांच्या अज्ञानी पणा मुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढत चालली आहे. सुजान नागरिकांनी फळे, भाजीपाल्याचा आग्रह न धरता उरलेले लॉकडाऊनचे दिवस उसळ डाळी वर काढावे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.कोरोना बाधित ठिकाणातून येणाऱ्या लोकां बरोबर संपर्क करताना दहावेळा विचार करायला हवा.
आपलं घर, आपली गल्ली, आपला विभाग, आपलं गाव आपलं शहर, आपला जिल्हा कसा कोरोनाच्या कचाट्यातून वाचवला जाईल याचा प्रत्येकानं विचार करण्याची वेळ आली आहे.शुक्रवारी तीन पोजीटिव्ह रुग्ण सापडल्याची बातमी बेळगावात त्सुनामी घेऊन आली प्रशासनाने चार हॉटेल लोजिंग आणि काही होस्टेल्स ताब्यात घेऊन त्याचे रुग्णालयात रूपांतर करण्याची सुरुवात केली. त्याच वेळी बेळगावकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.प्रशासनाने कोरोना बाधित परिसर सील केला आहे. पीडित रुग्ण कुणा कुणाच्या संपर्कात आलेत त्याची चौकशी सुरू झाली आहे.
मरकज मुळे बेळगाव प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढण्याची सर्कस सुरू झाली. कोरोनाचा राक्षस 30 वया खालील दोन युवकांना आणि एका 70 वर्षीय वृद्धाला घेऊन दाखल झालाय. यमाची काळी छाया बेळगावर दबक्या पावलांन पसरत चालली आहे.
आता बेळगाव करांच्या समजूत दार पणाची कसोटी आहे.घरात रहा, आपल्याला उपलब्ध असेल त्याच अन्नात भागवा नको त्या लोकांशी संपर्क टाळा…
Plz give +ve passant place or village name