दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात झालेल्या धर्म प्रचारासाठी इंडोनेशिया येथून दहा जण आले होते. धर्मसभा संपवून त्यांनी बेकायदेशीररीत्या बेळगावात प्रवेश केला आहे. व्हीजाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांचे होम क्वॉरांटाइन संपल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगावात टुरिस्ट विसा काढून प्रवेश केलेल्या इंडोनेशियातील दहा जणानी धर्मप्रचारासाठी दिल्ली येथे हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी थेट बेळगाव गाठले आहे. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून लवकरच त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांच्यावर एफआयआरची कारवाई करण्यात येणार आहे.
टुरिस्ट विसा म्हणून त्यांनी भारतात प्रवेश केला आहे. मात्र तसे पाहता त्यांनी मिशनरी विसा काढण्याची गरज होती. दिल्ली येथे झालेल्या तबलिगी जमातींमधील धर्म सभेसाठी त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी बेळगावात प्रवेश केला आहे. बेकायदेशीररीत्या विसा काढून त्यांनी धर्मप्रचारचा प्रसार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या त्यांना होम क्वॉरांटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. ते संपल्यानंतर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्यांचे वास्तव्य असल्याचे समजते. त्यामुळे माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांनी इंडोनेशिया तुन परतलेल्या दहा जणावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.