कोरोनामुळे एकवीस दिवस एकमेकांना भेटू न शकणाऱ्या आईची आणि तीन वर्षांच्या मुलीची आज भेट झाली आणि ते दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
जिल्हा रुग्णालयात नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या सुगंधा कोरीकोप्प यांची कोरोना रुग्णाच्या वार्डमध्ये नियुक्ती झाल्याने एकवीस दिवस त्यांना स्वतःच्या मुलीलाही भेटता आले नव्हते.त्यांना ठेवण्यात आलेल्या लॉजकडे मुलगी ऐश्वर्या हिला सुगंधाचे पती घेऊन आले होते.त्यावेळी दुरूनच सुगंधा यांनी मुलीला पाहिले.आईला पाहिल्यावर मुलगी आई मला तुझ्याकडे घे म्हणून रडायला लागली पण आईही मुलीला जवळ घेऊ शकत नव्हती.
मन घट्ट करून मुलीला दुरूनच तिने बघून टाटा करून लॉजमध्ये निघून गेली होती.शनिवारी ड्युटी संपवून सुगंधा आपल्या घरी आल्या त्यावेळी आई येत असल्याचे कळताच ऐश्वर्या धावतच आईला भेटायला गेली.आईजवळ जाताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.मुलीनेही आईला घट्ट मिठी मारली.नंतर आई रडायले हे पाहून आईच्या डोळ्यातील अश्रूही पुसले.
नर्स म्हणून सेवा बजावत असतें वेळी तिच्या वडिलांनी ऐश्वर्याला आपल्या आईला दुचाकीवरून दाखवायला आणले होते तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला होता व सोशल मीडिया राष्ट्रीय स्तरावरील न्यूज मीडियावर देखील झळकला होता मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी देखील सुगंधा यांचं कौतुक केलं होतं.
अन…21 दिवसांनी त्या चिमुरडीला भेटली तिची नर्स आई….बेळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना वार्डात सेवा बजावणाऱ्या सुनंदा या नर्स तीन आठवड्यानी आपल्या घरी गेल्या त्यावेळीही त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले मुलीनेही आईला मिठी मारली अन माऊलीच्या डोळ्यातील अश्रू पुसले तो आनंददायी क्षण…पहा खालील व्हीडिओत
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1087347961622796&id=375504746140458