लोककल्याण हेच आपले ध्येय आणि हेच आमचे कार्य या सेवाभावी स्वभावातून समाज हित जपत आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या लॉक डाऊन परिस्थितीमुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली असताना सतीश जारकीहोळी यांनी गांधी नगर भागातील गोर गरिबांना दोन लाखांची मदत देऊ केली आहे.
लॉक डाउन काळात न्यु गांधी नगर येथील गरीब नवाज फौंडेशनने 4 हजार हुन अधिक कुटुंबीयांना एक महिना पुरेल इतके राशन देत बांधिलकी जपली आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देश झुंजत असताना अनेक संस्था रस्त्यावर उतरून कामाला लागले आहेत. मात्र न्यु गांधी नगर येथील गरीब नवाज फौंडेशनने पहिल्या टप्प्यात 1800 कुटुंबाना तर दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी 3 हजार कुटुंबियांना मदत केली.या संस्थेने आवळ्याचा भोपळा न करता आपले काम हीच ईश्वरसेवा म्हणून त्यांनी अनेकांचे कुटुंब सावरले आहे.
पहिल्या टप्प्यात 3000 कुटुंबीयांना तर दुसऱ्या टप्प्यात 1800 कुटुंबियांना मदत केली आहे. तर पुढील टप्प्यात आणखी दोन हजार कुटुंबियांना मदत करणार आहेत. न्यू गांधीनगर येथे त्यांनी पाच हजार कुटुंबियांना एक महिना पुरेल इतके राशन वितरण केले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. न्यु गांधीनगर येथे अजिम पटवेगार नजीर पटवेगार धर्मगुरू मुस्ताक अशरफी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे साहित्य वितरण केले आहे. सतीश जारकिहोळी यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.