देशभरात लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक जण घरीच बसून आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना समान रेशन देण्याचा आदेश दिला आहे. मात्र रेशन दुकानदार याकडे कानाडोळा करत आहेत. तेव्हा साऱ्यांनाच समान रेशन द्यावे अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी केली आहे.
लॉक डाऊन काळात गरीब असो किंवा श्रीमंत हे सारे घरी बसून आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत जर रेशन वितरण करण्यासाठी रेशन दुकानदार भेदभाव करत असतील तर अनेकांना उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सर्वांना समान रेशन द्यावे अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी केली आहे.
नुकतीच त्याने जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. सध्या तरी राज्य सरकारने दोन महिन्याचे राशन देण्याचे त्यात आले आहे. मात्र एपीएल आणि बी पी एल यांच्यामध्ये भेदभाव न करता रेशन वितरण करण्याचे आदेश आम्ही दिले असल्याचे यावेळी वेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरस्वती पाटील यांना सांगितले आहे.
मात्र सरस्वती पाटील यांनी काहींनी समान रेशन वितरण करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसू लागला आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार तरी समान रेशन पुरवठा करावा आणि काटे मारी थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.