संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूमुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देश कोरोनाच्या भीती खाली आला आहे. मात्र काहींच्या उचापती अजूनही सुरूच आहेत. सारे जग कोरोनाच्या संकटात असताना देवतांबद्दल हि आता अफवांचे पीक मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील आठवडाभरात विविध ठिकाणच्या देव-देवतांचे असे झाले तसे झाले म्हणून अफवा पसरण्याचा प्रकार वाढीस लागले आहेत. नुकतीच सौंदत्ती यल्लमा देवीचे मंगळसूत्र तुटल्याची अफवा पसरविण्यात आल्याने मोठा गदारोळ माजला होता. ही अफवा खरी की खोटी याचा विचार न करता काहींनी थेट मंदिराच्या ट्रस्टींना फोन करून त्रास देण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे अनेकांना खात्री पटल्यानंतर ही अफवा खोटी असल्याचे समजले.
सौंदत्ती यल्लमा हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र येथील भाविक मोठ्या श्रद्धेने या देवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र मागील आठवड्यापासून लॉक डाऊन करण्यात आल्याने दर्शनासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आली आहे. काहींनी मात्र या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र तूटल्याची अफवा पसरविल्या ने मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत ट्रष्टीने असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या दर्शन बंद असले तरी देवीची नित्यनेमाने पूजा-अर्चा सुरू आहे. असे असताना मंगळसूत्र तुटल्या मुळे अपशकून झाला अशी भीती पसरविण्याचा प्रयत्न झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रवि कोठारगस्ती यांनी याबाबत खुलासा दिला आहे. असा कोणताच प्रकार मंदिरात घडला नसून भाविकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे आहे.