Friday, May 3, 2024

/

तळीरामांच्या आशा संपुष्टात

 belgaum

कर्नाटक सरकारने राज्यात येत्या मंगळवारपासून दारू विक्रीला परवानगी देण्याचा आपला विचार बदलताना आता मंगळवार दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत दारू बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे मध्ये एक दोन दिवस दारू दुकाने सुरू रहातील या तळीरामांच्या आशा संपुष्टात आशा संपुष्टात आल्या आहेत.दारू सुरू करा अशी मागणी काही तळी रामांनी चक्क जगदीश शेट्टर यांच्याकडे केली होती त्यामुळे त्यांना काहीश्या अंधुक आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र आता त्या आशा देखील मावळल्या आहेत.

 

 belgaum

लिकर लॉबी मद्यप्रेमींकडून राज्यात दारूविक्री सुरू करण्यात यावी यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात येत असला तरी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अबकारी आयुक्त यशवंत यांनी राज्यातील दारूबंदीचा कालावधी राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत वाढविल्याची सांगितले.

दरम्यान एमआरपी दारू विक्री दुकाने मंगळवारपासून खुली होतील असे अनुमान आहे. तथापि हे अनुमान देखील चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. कारण सध्या सर्वत्र 144 कलमान्वये जमावबंदी असल्यामुळे ही दुकाने देखील 14 एप्रिलपासून सुरू होतील असे सांगितले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.