स्वादुपिंड ही जठर आणि लहान आतडय़ांच्या मागे, पोटाच्या पोकळीत असणारी एक लांबट आणि चपटय़ा आकाराची ग्रंथी असते. ही ग्रंथी आपल्या पचनसंस्थेचा एक भाग तर असतेच, पण अंत:स्रावी संस्थेचाही
(एन्डोक्राईन सिस्टीम) प्रमुख हिस्सा असते. अंत:स्रावी संस्था म्हणून स्वादुपिंडातून स्रवणारी इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन आणि पॅनक्रिअॅटिक पॉलिपेप्टाइड ही संप्रेरके रक्तात सोडली जातात. त्याचप्रमाणे जठरातून लहान आतडय़ांत येणारी आहारातली प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कबरेदके यांचे विघटन करणारा ‘स्वादुपिंड रस’ हा पाचकरस लहान आतडय़ांत सोडला जातो.
कारणे
अती मद्यपान आणि पित्ताशयातील खडे ही स्वादुपिंडाला सूज येण्याची प्रमुख कारणे असतात. मद्यपानामुळे स्वादुपिंडाच्या ग्रंथीतील पेशी सुजतात आणि त्यांचे आकारमान वाढते. पित्ताशयातून निसटलेले लहान-मोठे खडे स्वादुपिंडातून आतडय़ात पाचक रस नेणाऱ्या नलिकेत अडकतात. त्यामुळे स्वादुपिंडातील नलिकांमधील दाब वाढून त्या फुटतात. त्यातील पाचकरसामुळे स्वादुपिंडातील ग्रंथी आणखीनच फुटू लागतात आणि तीव्र प्रमाणात सूज येते.
• सल्फा औषधांचा, गर्भनिरोधक गोळ्यांचा, अँटिबायोटिक्सचा अधिक वापर, डोकेदुखी, सांधेदुखीसाठी घेतली जाणारी औषधे, अनियंत्रित मधुमेह, स्वादुपिंडातून पाचक रस अतिरिक्त स्रवणे, रक्तामध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असणे या कारणांनीसुद्धा स्वादुपिंडाला सूज येण्याची शक्यता असते.
• पोटाला झालेली इजा, पोटावरील शस्त्रक्रिया, धूम्रपान,स्वादुपिंडाच्या दाहाबाबत कौटुंबिक इतिहास, पॅराथायरॉईड संप्रेरकाची आणि रक्तातील कॅल्शिअमची पातळी जास्त असणे अशा कारणांमुळेही स्वादुपिंडामध्ये दाह निर्माण होतो.
• काही रुग्णांत जंतुसंसर्ग, सिस्टीक फायब्रोसीससारखे आजार, स्वादुपिंडाचा कर्करोग यामुळेही स्वादुपिंडाला सूज आल्याचे आढळून येते.
गुंतागुंत- स्वादुपिंडामध्ये पाचक रस असतानाच त्यातील घटकांमुळे स्वादुपिंडाच्या पेशींना सूज येते. ही सूज काही काळाने बरी होते. पण पेशींवर एक प्रकारचा व्रण राहतो. सूज येण्याचा हा प्रकार पुन:पुन्हा होत गेल्यास पेशी निकामी होऊन स्वादुपिंडाचे कार्य मंदावते. काही काळाने ते निकामी बनू लागते. स्वादुपिंड निकामी होऊ लागल्यावर अन्नपचनाचे कार्य बिघडते आणि पचनाचे विकार उद्भवू लागतात.
त्याचप्रमाणे इन्सुलिनचे स्रवणे कमी होऊन मधुमेह होतो.
प्रतिबंधक उपाय
स्वादुपिंडाची सूज नष्ट करायला परिणामकारक उपाय नसतो. त्यामुळे प्रतिबंधक उपायच महत्त्वाचे ठरतात. यात पित्ताशयात खडे होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी. असे खडे झाल्यास त्वरित उपचार घ्यावा. मद्यपान टाळावे. प्रतिजैविकांचा आणि अकारण औषधांचा अतिवापर टाळावा. दूषित पाणी आणि जंकफूड, उघडय़ावरील अन्न टाळावे. घरच्या आहारावर भर द्यावा. आहार समतोल आणि चौरस ठेवावा.
लक्षणे- स्वादुपिंडाला सूज आल्यावर पाचक रस स्वादुपिंडातून आतडय़ांमध्ये जाऊन तीव्र वेदना होतात. काहीही खाल्ल्यानंतर पोट वरच्या बाजूला कमालीचे दुखते. या वेदना पोटातून आतील बाजूने पाठीकडे जातात. एकदा दुखू लागल्यावर त्या वेदना न थांबता सतत जाणवत राहतात. पोटावर दाब दिल्यानंतर तीव्र वेदना होतात. या रुग्णांमध्ये मळमळणे, उलटय़ा होणे, ताप येणे अशीही लक्षणे आढळतात. त्यांच्या रक्तदाबामध्ये, रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये सतत चढउतार होत राहतो. सूज खूप वाढली तर फुप्फुसांमध्ये पाणी होते.
स्वादुपिंडाची सूज दीर्घकाळ राहिल्यावर वरचेवर पोटात दुखण्यासोबत वजन झपाटय़ाने कमी होणे, शौचाला तेलकट होणे अशी लक्षणे हमखास दिसतात.
उपचार
हेमिओपॅथी ने हा विकार पुर्ण बरा होतो.
डाॅ सोनाली सरनोबत
www.drsonalisarnobat.com
9916106896
9964946918