गुरुवारी बेळगाव तालुक्यातील कोरोला बाधित यांची संख्या चार वर पोहोचली आहे. यामध्ये नव्याने येळ्ळूर गावात एक पॉझिटिव्ह महिला सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे. या या महिलेचा पती चिकन विक्रीचा व्यवसाय करत होता. यामुळे लॉक डाऊन काळात पार्ट्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दिल्लीहून परतलेल्या येळ्ळूर येथील पती-पत्नींचा अहवाल सुरुवातीला निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा संबंधित महिलेची तपासणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येळ्ळूर गावात मोठा गोंधळ मधला आहे. गावातील रस्ते व इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना बाधित असलेल्या महिलेचा पती फिश विक्री करतो मात्र काही दिवसांपूर्वी पासून तो कोंबड्या विकत होता. मात्र काही तरुणांनी संबंधितांकडून चिकन किंवा कोंबड्या घेऊन शिवारात जोरदार पार्ट्या केल्या होत्या इतकेच काय तर कोरोना बाधितांची बिर्याणी देखील काहीनी खाल्ली आहे. कोरोना हा काही दिवसानंतर आपला प्रभाव दाखवतो. ज्या तरुणाने संबंधितांकडून कोंबड्या घेऊन पार्ट्या केल्या आहेत त्यांची पाचावर धारण बसली आहे.
सुरुवातीला आम्हाला काय होते अशा अविर्भावात वावरणारे तरुण आता भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. येथे आढळून आलेल्या पॉझिटिव्ह महिलेच्या पती कडूनच अनेकांनी कोंबड्या घेऊन पार्ट्या केल्या आहेत त्याचा परिणाम भोगावा लागणार का असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे येळ्ळूर येथील चिकन पडले महागात अशी अवस्था निर्माण झाली आहे. सध्या गावातील सर्व रस्ते आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले असले तरी या आधी केलेले कारणाने महागात पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे वर्तविण्यात येत आहे.