कोरोणामुळे मागील महिन्याभरापासून अनेकांचे जगणे बेहाल झाले आहे. अशा परिस्थितीत करावे तरी काय असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. मात्र आता राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला असून तीन महिन्याचे राशन आधीच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन सुरूच आहे. त्यामुळे दिवसा मजूर आणि गोरगरीब लोकांची निराशेची परिस्थिती निर्माण झाली आहे. बरेच लोक त्रस्त आहेत हे ओळखून राज्य सरकारने बीपीएल कार्डधारकांना तीन महिन्यांच्या मोफत तांदूळ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रेशन कार्डधारकांना रेशन देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे आता एप्रिल, मे आणि जूनमध्ये कुटुंबाना या तीन महिनाभराचे राशन देण्यात येणार आहे. तिप्पट राशन आता देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता त्रास होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली आहे. या निर्णयामुळे अनेकांना धावपळ करणे टळले आहे.
बीपीएल आणि एपीएल लाभार्थ्यांना एकूण तीस किलो तांदूळ मिळणार आहे. दहा किलो तांदूळ दहा रुपयांना मिळणार असल्याने आता आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे. लॉक डाऊन काळात हा मोठा निर्णय असून रेशन धारक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.