Saturday, April 20, 2024

/

‘त्या’ धार्मिक सभेला हजेरी लावणाऱ्यांची संख्या वाढली

 belgaum

दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलीगी जमातीच्या धार्मिक सभेला उपस्थित राहिलेल्या बेळगावच्या 10 जणांची ओळख पटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता त्या सभेला हजेरी लावलेल्या एकूण 62 जणांना शोधून काढले आहे.

या सर्वांपैकी मधुमेह, दमा आणि रक्तदाबाचा विकार असणाऱ्या पन्नाशी ओलांडलेल्या 27 जणांना सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

तथापि ओळख पटलेल्या 62 जणांपैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलीगी जमातीच्या धार्मिक सभेला उपस्थित राहिलेल्या बेळगावातील नागरिकांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.