सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत अन बेळगाव शहर परिसरात आग लागण्याच्या घटना घडत आहेत.बेळगाव सी बी टी बस स्थानका जवळील श्रीराम मेडिकल या दुकानाला शनिवारी मध्यरात्री आग लागल्याने लाखों रुपयांची महागडीऔषधे आगीत जळून खाक झाली आहेत.
शनिवारी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.मार्केट पोलीस स्थानकाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री राम मेडिकल या दुकानाला आग लागल्याचे समजताच तात्काळ अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले मात्र तोवर दुकानातील लाखोंची औषध जळली होती.
नंदकिशोर सारस्वत यांच्या मालकीचे श्रीराम मेडिकल हे औषध दुकान असून ते रात्री 9 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.लॉक डॉउन असल्याने व बस स्थानक बंद असल्याने या भागात रहदारी देखील कमी झाली आहे.
मार्केट पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे आगीत भस्म झालेली औषधे लाखों रुपयांची आहेत मात्र रविवारी सकाळी पर्यंत नुकसान झालेला आकडा लाखात असला तरी किती आहे याबाबत पोलीस सायंकाळी माहिती देणार आहेत.