Thursday, December 26, 2024

/

लॉक डाऊनमध्येही त्यांनी राखले सामाजिकतेचे भान

 belgaum

संपूर्ण देशात लॉक डाऊन सुर असल्याने अनेकजण घराबाहेर पडण्याची धजत नाहीत. मात्र अशा परिस्थितीतही अनेकांना मदत करणारे काही कमी नाहीत. अशीच घटना बेळगाव येथे घडली सिविल हॉस्पिटल मधून त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांचे काम आजही कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गावी परतण्याची कोणतीही सुविधा नसलेल्या गोकाकच्या एका बाळंतीणीला सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी वेळीच मदतीचा हात दिला. यामुळे ती बाळंतीण तिचे बाळ आणि आई वडिलांसह सुखरूप गावाकडे परतली.

सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या गोकाकमधील एका बाळंतीणीवर रविवारी आपल्या कुटुंबीयांसह बेळगावात अडकून पडण्याची वेळ आली होती. तथापि याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी त्या महिलेची विचारपूस केली. तसेच त्या बाळंतिणीला तिचे मूल आणि आई वडिलांसमवेत आपल्या कारगाडीतून गोकाकला तिच्या गावी सुखरूप पोहोचविले.

Angolkar food for needy
Angolkar food for needy

सुरेंद्र अनगोळकर हे एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते असून त्यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिले जाते. याव्यतिरिक्त शहरातील तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना ते स्वतःची खाजगी रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देत असतात. त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराचा फायदा न होता मृत्युमुखी पडलेल्या गरीब रुग्णांचे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी ते मोफत शववाहिका देखील उपलब्ध करून देत असतात.

गोरगरीब अडल्या नडलेल्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजणाऱ्या सुरेंद्र यांनी आजपर्यंत हजारो लोकांना मोफत भोजन दिले आहे. दरम्यान रविवारी आपल्याला आपल्या गावी सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था केल्याबद्दल संबंधित बाळंतीण महिलेसह तिच्या आईवडिलांनी अनगोळकर यांना शतशः धन्यवाद दिले आहेत.

मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी अनगोळकर पत्र दिले त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबाला संतोष कोचेरी रोहित किल्लेकर योगेश कलघटगी यांनी त्यांना गावी पोचवलं. जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांनी अनगोळकर यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.