Friday, December 27, 2024

/

आम्हाला मारा पण पोटाला खायला द्या; परराज्यातील कामगारांची आर्त हाक

 belgaum

पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर आलेल्या कामगारांवर लॉक डाऊन
मुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत बेळगावातही अनेक कामगार अडकून पडले आहेत. त्यामुळे येथील कामगार शेतामध्ये जे सापडेल ते खाऊन पोट भरत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास साहेब आम्हाला मारा पण पोटाला खायला द्या, अशी आर्त हाक ते देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हृदय पिळवटून जात आहे. अशा परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष झाले तरी शेतकरी त्यांना सहकार्य करताना दिसत आहेत.

मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये बिहार व ओरिसा या राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात कामासाठी आले होते. लॉक डाऊनमुळे हवं कामगार तेथेच अडकून पडले आहेत. त्यांना रेशनची व्यवस्था सरकारने करायला हवी होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते अनेक शेतातील भाजीपाला व इतर जिन्नस खाऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत.

उपासमारीची वेळ आल्याने हे कामगार शेतामध्ये जाऊन जे सापडेल ते खाण्याकडे वळत आहेत.मात्र याबाबत शेतकऱ्यांनी हटकले असता आम्हाला खायला द्या आणि कितीही मारा अशी विनवणी करताना ते कामगार दिसत आहेत. त्यामुळे शेतकरीही त्यांच्या हालअपेष्टा पाहून त्यांना सहकार्य करू लागले आहेत. हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बेळगावात विविध संस्था आर्थिक मदती बरोबरच साहित्याचे वितरण करू लागले आहेत. मात्र येथील औद्योगिक वसाहतीकडे आता सामाजिक संस्थांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तेथील कामगारांना उपासमारीची वेळ आली असताना देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सरकारनेही अशा कामगारांना एकत्रित करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतात सापडेल ते खाऊन आपली भूक भागवण्यावर तेथील कामगारांनी भर दिला आहे. आता तरी सरकारने आपल्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ते करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.