कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि परिसरात अनेक संघटना आपापल्या परीने मदत करत आहेत पण बेळगाव शहरापासून जवळजवळ पंधरा किलोमीटरवर अगसगा आंबेवाडी रोडवरील खडीमशीनवरील लमानी समाजातील कुटुंबाना मदत पोहीचली नसल्याचे समजताच जायंट्स सखीच्या वतीने संघटनेतील सदस्यांना किरणामाल देण्याचे आवाहन करण्यात आले यास लागलीच ज्योती अनगोळकर,निता पाटील,शितल नेसरीकर,अर्चना पाटील,विद्या सरनोबत,शितल पाटील,चंद्रा चोपडे,सुलोचना कुट्रे, सुलक्षणा शिनोळकर आणि ज्योती सांगूकर यांनी आपापल्या परीने साखर, चहापावडर, तेलाची पाकिटे,तांदूळ,गूळ, कांदे,बटाटे,मिठाची पाकिटे,भाजीपाला, गव्हाचे पीठ,तूरडाळ अशी मदत केली.
लॉकडाऊनमुळे सगळे व्यवसाय ठप्प झाले आहेत त्याला खडीमशीन सुध्दा अपवाद नाहीत,त्यामुळे तेथील रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे,आणि हा भाग शहरापासून खूप लांब असल्याने तिथपर्यंत कोणीही जाऊन पोहचले न्हवते हे समजताच आम्ही जायंट्स सखीच्या वतीने पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून वाटप केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या या किटमध्ये एक किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, दोन किलो साखर, एक लिटर तेल, 200ग्रॅम चहा पावडर, एक मीठ पाकीट,दोन किलो कांदे,दोन किलो बटाटे, ढबु मिरची, टोमॅटो,कोबीज असे साहित्य असून जवळपास चाळीस कुटुंबाना याचे वितरण करण्यात आले अशी माहिती जायंट्स सखीच्या अध्यक्षा नम्रता महागावकर, संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर,उपाध्यक्षा निता पाटील यांनी सांगितले.
वस्तूंचे वितरण करत असताना सामजिक अंतर ठेवून समाजाला आदर्श देण्याचे काम यावेळी जायंट्स सखीच्या सदस्यांनी आणि खडीमशीनवर काम करणाऱ्या कुटुंबांनी केले.यावेळी जायंट्स इंटरनॅशनलचे स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर,शितल पाटील, जायंट्स मेनचे माजी अध्यक्ष उमेश पाटील,मधू बेळगावकर उपस्थित होते.