कर्नाटक राज्यात कित्येक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असतांना प्रत्येक माणसाला 7 किलो तांदूळ, आणि 1 किलो गहू दिला जात होता. होते. पण राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून रेशनवर दिले जाणारे धान्य कमी केले जात आहे.
प्रत्येक माणसाला 5 किलो तांदूळ सध्या देण्यात येत आहे.सध्या कोरोनामुळे कष्टकरी जनतेला आणि रोज कमवून खाणाऱ्यांना घरात रोज चूल पेटवणे अवघड झाले आहे.
कोरोनामुळे रोजगार नसल्यामुळे घरीच बसून राहावे लागत आहे.रेशनवर देखील धान्य भाजप सत्तेत आल्यापासून कमी मिळत आहे.रेशनवर मिळणाऱ्या कमी धान्यात दोन वेळा हाता तोंडाची गाठ पडणे अवघड झाले आहे.
बाजारात जावून खरेदी करायची तर रोजगार नसल्यामुळे हातात पैसे नाहीत अशी रोज कमावून खाणाऱ्या जनतेची अवस्था झाली आहे. कुटुंबातील चार सदस्यांना फक्त 20 किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देत आहेत. हेच का अच्छे दिन.