चिकोडी तालुक्यातील जवानाला बेकायदेशीररित्या साखळदंड घालून पोलीस स्थानकात नेल्याचे प्रकरण आता पोलिसांना चांगलीच भोवणार आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री राज्य बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. त्यामुळे ही चौकशी पोलिसांना भोवणार असा कयास लावण्यात येत आहे.
याबाबत जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी संबंधित जवानावर झालेल्या अन्यायाविरोधात सखोल चौकशी करावी असे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्याकडे गेले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश राज्य सरकारच्या गृह मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे याची चौकशी आता राज्य गृहमंत्री बसवराज बोम्मई हे करणार आहे.
यावेळी बसवराज बोंम्मई यांनी पोलीस व जवानांची सेवा अनमोल आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोघांमधील संघर्ष बिघडविणारे वातावरण चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास त्यांनी दिला आहे.
चिकोडी येथील सीआरपीएफ कोब्रा कमांडोचे जवान सचिन सुनील सावंत हे सुट्टीवर आले होते. त्यांच्या घरासमोर ते वाहन धुवत असताना पोलिसांनी मास्क का घातला नाही असा आरोप करत त्याला साखळदंड व मारहाण केल्याचे चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर याची दखल जलसंपदा मंत्र्यांनी घेतली त्यानंतर हा प्रकार संपूर्ण राज्यभर पसरला. पोलिसांनी केलेले कृत्य अमानवी आहे, असा आरोप होऊ लागल्याने त्याची चौकशी आता गृहमंत्र्यांनी करण्याचे ठरविले आहे.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी पोलिसांना खडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आवाहन केले होते. याच दरम्यान दिनांक 23 एप्रिल रोजी संबंधित सीआरपीएफ जवान आपल्या घरासमोर वाहन धुवत असताना पोलिस व त्याच्यात वादावादीचे प्रकार घडला. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हा सारा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून करण्यात आला. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी वारंवार होत होती. याची दखल घेत गृहराज्यमंत्री बसवराज बोंम्मइ यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.