चिकोडीच्या जे एम एफ सी कोर्टाने जामीन दिल्या नंतर सी आर पी एफ चा जवान सचिन सावंत यांची हिंडलगा जेल मधून सुटका करण्यात आली.
23 एप्रिल रोजी मास्क न घातल्याने एकसंबा गावात पोलिसांनी त्याला अटक करून बेड्या घातल्या होत्या त्या नंतर हे प्रकरण सोशील मीडिया व राष्ट्रीय स्तरावरील वृत्त वाहिन्यांनी याची दखल घेतलो होती.
जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जवानाला पाठिंबा दिला होता चौकशीची मागणी केली होती त्या नंतर गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी देखील उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती.
मंगळवारी दुपारी त्याला जामीन मिळाला होता त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हिंडलगा जेल मधून त्याची सुटका करण्यात आली. त्याचे सी आर पी एफ चे जवान हिंडलगा जेल समोर उपस्थित होते. बेळगाव येथील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. सी आर पी एफ अधिकाऱ्यांनी सचिन यांना जांबोटीं येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये घेऊन गेले आहेत.